Mohammed Shami one-handed catch off his own bowling
esakal
Mohammed Shami one-handed catch off his own bowling: मोहम्मद शमीला, फिटनेसचं कारण देत संघाबाहेर ठेवणाऱ्या निवड समिती प्रमुख अजित आगरकरने हा कॅच पाहायलाच हवा.. दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पूर्व विभागाकडून खेळणाऱ्या शमीने गोलंदाजीत कमाल करताना मध्य विभागाचे कंरबडे मोडले. पण, यावेळी या ३६ वर्षीय गोलंदाजाने चपळतेने टिपलेल्या झेलची अधिक चर्चा होतेय. शमीने स्वतःच्याच गोलंदाजीवर मध्य विभागाच्या हर्ष दुबेचा घेतलेल्या झेलचा Video सध्या सोशल मीडिया गाजवतोय.