
भारत आणि इंग्लंड संघात लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंटवर होत असलेला तिसरा कसोटी सामना अत्यंत रोमांचक होत आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये वाद झाल्याचेही दिसले.
दिवसाच्या शेवटी इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्रॉली आणि बेन डकेट वेळ वाया घालवत असल्याचे दिसले होते. बुमराहने या डावातील पहिले षटक टाकले होते. पण या षटकानंतरच वेळ संपल्याने लगेचच तिसर्या दिवसाचा खेळ संपला.