

Mohammed Siraj
Sakal
Siraj will lead Hyderabad Ranji Team: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला (Mohammed Siraj) मोठी जबाबदारी मिळाली आहे. सिराज सध्या न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळत असला तरी आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी आणि टी२० वर्ल्ड कप २०२६ साठी भारतीय संघाचा भाग नाही. त्यामुळे १९ जानेवारीपासून मार्चच्या मध्यापर्यंत त्याच्याकडे रिकामा वेळ असणार आहे.
अशात या काळात तो रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेच्या (Ranji Trophy) दुसऱ्या टप्प्यात सहभागी होणार आहे. इतकेच नाही, तर तो आता कर्णधाराच्या भूमिकेतही दिसणार आहे.