Virat Kohli's Fan Breached Security| India vs New Zealand
Sakal
Cricket
IND vs NZ, Viral Video: विराट कोहलीचा चाहता अचानक मैदानात पळत आला अन् थेट मिठीच मारली, पुढे काय झालं पाहा
Virat Kohli Fan Breaches Security in Rajkot: भारत आणि न्यूझीलंड संघात झालेल्या दुसऱ्या वनडे दरम्यान विराट कोहलीच्या चाहत्याने सुरक्षा तोडून मैदानात घुसून त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Fan Hugs Virat Kohli During India vs New Zealand 2nd ODI: विराट कोहलीची लोकप्रियता देशभरात मोठ्या प्रमाणात आहे. तो कोणत्याही मैदानात गेला तरी त्याचे चाहते मोठ्या प्रमाणात त्याला प्रोत्साहन देताना दिसतात. मात्र अशातच काही चाहते नियमांचे उल्लंघन करतानाही दिसतात.
असाच प्रकार भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात (India vs New Zealand) बुधवारी (१४ जानेवारी) झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात झाला. विराटचा चाहता (Virat Kohli's Fan) सुरक्षा तोडून अचानाक मैदानात घुसला होता.

