IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

India vs West Indies 2nd ODI, Predicted Playing XI & Live Streaming: भारत आणि वेस्ट इंडिज संघात दुसरा वनडे सामना गुवाहाटीला बुधवारी होणार आहे. या सामन्यात मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे.
India's Predicted Playing XI

India's Predicted Playing XI

Sakal

Updated on: 

India vs West Indies 2nd ODI, Predicted Playing XI : भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध तिरुअनंतपुरमला झालेला पहिला वनडे सामना ८ विकेट्सने सहज जिंकला होता. त्यामुळे तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे.

पहिल्या सामन्यात कुलदीप यादव, विराट कोहली आणि शुभमन गिल हे स्टार ठरले होते. कुलदीपने ४ विकेट्स घेत सामनावीर पुरस्कारही जिंकला होता, तर विराट आणि शुभमन यांनी शतके केली होती. त्यामुळे भारताने ५० चेंडू राखून विजय मिळवला होता.

आता दुसऱ्या सामन्यातही असेच वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न भारताचा असेल. बुधवारी (३० सप्टेंबर) भारत आणि वेस्ट इंडिज संघात दुसरा वनडे सामना खेळवला जाणार आहे. हा सामना गुवाहाटीला होणार असून हा सामना जिंकून मालिकाही खिशात टाकण्याची संधी भारतीय संघाला आहे.

India's Predicted Playing XI
IND vs WI 1st ODI : सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला, आता विराट कोहली म्हणतो, माझं लक्ष...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com