भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) याने इंग्लंड दौरा गाजवला... दी ओव्हल कसोटीत भारतीय चाहत्यांनी विजयाची आशा सोडली होती, परंतु त्याने जिद्दीने सामना फिरवला. इंग्लंडला पाचव्या दिवशी विजयासाठी ३५ धावांची गरज असताना हाती ४ विकेट्स होत्या. तेथून सिराजने सामना फिरवला आणि भारताला ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिली. मोहम्मद सिराजने त्यानंतर साऱ्यांनी कौतुक केले. पण, आज सिराजच्या एका कृतीने पुन्हा सर्वांचे मन जिंकले.