

Arshdeep Singh
Sakal
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रविवारी (१८ जानेवारी) वनडे मालिकेतील निर्णायक सामना खेळला जाणार आहे. हा सामना मालिकेचा विजेता ठरवणार आहे, कारण सध्या मालिकेत १-१ अशी बरोबरी आहे. पण हा सामना सुरू होण्यापूर्वी अर्शदीप सिंगच्या खेळण्यावर चर्चा होत आहे.
अर्शदीपने गेल्या काही वर्षात त्याच्या कामगिरीने प्रभावित केले आहे. नव्या चेंडूवर तो विकेट घेण्यासाठी भारताचा आता हुकमी एक्काही समजला जातो. मात्र त्याला न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या दोन्ही वनडेमध्ये खेळवले गेलेलं नाही. त्यामुळे बरीच टीका भारतीय संघव्यवस्थापनेवर झाली आहे.
आता तिसऱ्या सामन्यात तरी त्याला खेळवले जाणार का, असा प्रश्न आहे. याबाबत आता मोगम्मद सिराजने भाष्य केले आहे.