Mohammed Siraj’s humorous reaction after Team India’s victory has gone viral
esakal
Siraj says he carried drinks and bowled in nets during tournament : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या फायनलमध्ये न्यूझीलंडवर ९६ धावांनी विजय मिळवून जेतेपद कायम राखले. सलग दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणारा आणि सर्वाधिक ३ जेतेपद नावावर असलेला भारत हा पहिलाच संघ ठरला आहे. या ऐतिहासिक कामगिरीत टीम इंडियाच्या सर्व १५ सदस्यांचा आणि सपोर्ट स्टाफचाही खूप मोलाचा वाटा आहे. या विजयानंतर टीम इंडियाचे सर्व शिलेदार आपापल्या भावना व्यक्त करताना दिसले. त्यामध्ये मोहम्मद सिराजही ( Mohammed Siraj ) होता आणि त्याच्या विधानाची आता जोरदार चर्चा रंगली आहे.