टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?
MOHSIN NAQVI: आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांचा कार्यकाळ एप्रिल २०२७ मध्ये संपणार आहे. भारत-पाकिस्तानमधील तणाव आणि अलीकडील घटनांमुळे त्यांच्या मुदतवाढीला भारताचा पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी मानली जात आहे.
नवी दिल्ली : आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ एप्रिल २०२७ मध्ये संपणार असून, त्यानंतर त्यांना पुन्हा या पदावर निवडले जाण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे.