
भारत-पाकिस्तान आशिया चषक २०२५ फायनल २८ सप्टेंबरला होणार आहे.
गट फेरीतील दोन्ही सामन्यांत भारताने पाकिस्तानला पराभूत केले.
पहिल्या सामन्यात हस्तांदोलन न केल्यामुळे पाकिस्तान नाराज झाला.
India vs Pakistan Asia Cup 2025 controversy : भारत-पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेची फायनल उद्या म्हणजेच २८ सप्टेंबरला होणार आहे. भारताने या पर्वातील दोन्ही सामन्यांत पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली आहे. पण, या दोन्ही लढती विवादात अडकल्या. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने हस्तांदोलन न केल्याने पाकिस्तानी चिडले आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यात वादग्रस्त सेलिब्रेशन करून भारतीयांना डिवचले. प्रकरण आयसीसीसमोर गेले आणि त्यांनी हॅरिस रौफला दंड ठोठावला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या तक्रारीची दखल घेत आयसीसीने कर्णधार सूर्यकुमार यादवलाही दंड सुनावला.