Pakistan has reportedly warned the ICC about withdrawing from the T20 World Cup 2026 in solidarity with Bangladesh
esakal
Mohsin Naqvi Pakistan ICC warning Bangladesh issue: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB) सध्या 'बेगानी शादी में, अब्दुल्ला दिवाना' झाला आहे. बांगलादेशने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने भारतात न खेळण्याचा आपला हट्ट कायम ठेवला आहे. बांगलादेशात जे काही सुरू आहे, त्याविरोधात भारतात प्रचंड संतापाची लाट आहे. त्यामुळेच बांगलादेशी खेळाडू मुस्ताफिजूर रहमानची इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधून कोलकाता नाइट रायडर्सने हकालपट्टी केली. त्यानंतर बांगलादेश सरकार व बांगलादेश क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करून वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर हलवण्याची मागणी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) BCB ची समजूत काढण्याचा प्रयत्नही अपयशी ठरला. त्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी मुद्दाम वादात शिरले आहेत.