MS Dhoni चेन्नई सुपर किंग्सचा नवा प्रशिक्षक? R Ashwin चे मोठे विधान, स्टीफन फ्लेमिंगच्या उचलबांगडीची चर्चा; म्हणाला, तुम्हाला दुसरा...

Will MS Dhoni become Chennai Super Kings coach? आर अश्विन याने चेन्नई सुपर किंग्स संघात महेंद्रसिंग धोनी याच्या नव्या भूमिकेबाबत मोठे संकेत दिले आहेत. चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग भविष्यात पद सोडण्याचा निर्णय घेतल्यास CSK ने दुसऱ्या कोणाचा शोध घेण्याची गरज नाही, असे अश्विनने म्हटले आहे.
R Ashwin has hinted that Chennai Super Kings should consider MS Dhoni as head coach

R Ashwin has hinted that Chennai Super Kings should consider MS Dhoni as head coach

Updated on

Stephen Fleming exit rumours from Chennai Super Kings: पाचवेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये निराशाजनक कामगिरीचा सामना करावा लागला आहे. १४ पैकी आठ सामन्यांत त्यांची हार झाली आणि त्यांना साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni ) प्रथमच आयपीएलच्या पर्वात एकही सामना खेळला नाही. दुखापतीमुळे त्याला IPL 2026 मध्ये बाहेर बसूनच सर्व सामने पाहावे लागले. ४५ वर्षीय धोनी पुढच्या वर्षी खेळणार का, याचे अपडेट्स अद्याप कुणाकडेच नाहीत. गेल्या काही वर्षांप्रमाणेच, तो हंगामापूर्वी आपल्या तंदुरुस्तीनुसार याबाबतचा निर्णय घेईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com