

MS Dhoni Post | India vs New Zealand | T20 World Cup 2026
Sakal
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने रविवारी टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा जिंकून इतिहास रचला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभूत केलं आणि तिसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कप उंचावला.
तीन टी२० वर्ल्ड कप (T20 World Cup) जिंकणारा भारतीय संघ (Team India) पहिलाच संघ तर ठरला, याशिवाय सलग दुसऱ्यांदा आणि घरच्या मैदानावर टी२० वर्ल्ड कप जिंकणाराही भारत पहिलाच संघ आहे.
दरम्यान, हा इतिहास लाखो प्रेक्षकांसमोरच नाही, तर अनेक दिग्गजांसमोरही घडला. या सामन्यासाठी स्टेडियममध्ये भारताचे वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव, एमएस धोनी, रोहित शर्मा देखील उपस्थित होते.