
भारताचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्याच्या सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याने २०२० मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, पण त्याने आयपीएलमध्ये खेळणे कायम केले आहे.
आता तो पुढच्या आयपीएल हंगामात खेळणार की नाही, याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. त्याने याबाबत तो येत्या काही महिन्यात निर्णय घेईल असं त्याने सांगितले होते. असे असतानाही अद्यापही धोनीची लोकप्रियता कमी झालेली नाही.