T20 WC, IND vs NZ: सेमीफायनल झाली, आता फायनलची बारी! MS Dhoni सूर्याच्या टीम इंडियाला चिअर करण्यासाठी अहमदाबादमध्ये दाखल; Video

MS Dhoni arrives in Ahmedabad: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी२० वर्ल्ड कप २०२६ चा अंतिम सामना होणार आहे. एमएस धोनी अहमदाबादला पोहोचला असून स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
MS Dhoni | India vs New Zealand | T20 World Cup 2026

MS Dhoni | India vs New Zealand | T20 World Cup 2026

Sakal

Updated on

MS Dhoni arrives in Ahmedabad ahead of T20 WC Final: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (८ मार्च) टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. हा सामना भारत आणि न्यूझीलंड संघात होणार आहे. या सामन्यासाठी देशभरात मोठी उत्सुकता आहे.

१ लाखाहून अधिक प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित असण्याची शक्यता आहे, अशात घरच्या प्रेक्षकांसमोर पुन्हा एकदा टी२० वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. पण भारतीय संघालाही न्यूझीलंड संघाकडून (India vs New Zealand) तगडे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. अशात या सामन्यासाठी अनेक सेलिब्रेटी स्टेडियममध्ये उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

<div class="paragraphs"><p>MS Dhoni | India vs New Zealand | T20 World Cup 2026</p></div>
ऐ बाई, बस खाली...! MS Dhoni ने जल्लोष करणाऱ्या साक्षीला का रोखले? IND vs ENG सामन्यातील सर्वात सुंदर क्षण Video Viral
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com