ऐ बाई, बस खाली...! MS Dhoni ने जल्लोष करणाऱ्या साक्षीला का रोखले? IND vs ENG सामन्यातील सर्वात सुंदर क्षण Video Viral

MS Dhoni stops Sakshi Dhoni celebration viral video: भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात एक अतिशय गोड क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या साक्षी धोनी सेलिब्रेशन करत असताना महेंद्रसिंग धोनीने तिला थांबवले... पण का?
Sakshi Dhoni celebration stopped by MS Dhoni viral moment

Sakshi Dhoni celebration stopped by MS Dhoni viral moment

esakal

Updated on

Sakshi Dhoni celebration stopped by MS Dhoni viral moment: भारत-इंग्लंड ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना थरारक झाला... भारताने २५३ धावा उभ्या केल्यानंतर इंग्लंड हार मानेल असे वाटत होते, पंरतु पाहुण्यांनी शेवटच्या षटकापर्यंत मॅच खेचली... हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सेलिब्रेटींची उपस्थिती होती... भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याच्या पत्नी साक्षीसह हा सामना पाहत होता.. रोहित शर्माही त्याच्या कुटुंबियांसह उपस्थित होता.. सामान्य प्रेक्षकांप्रमाणे धोनीच्याही हृदयाची धडधड मॅच पाहताना वाढत होती. एक प्रसंग असा घडला की साक्षी सोफ्यावरून उठून सेलिब्रेशन करायला लागली, परंतु मागे उभ्या असलेल्या धोनीने 'ऐ बाई बस खाली' असा जणू इशाराच तिला केला.. हा Video तुफान व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com