MS Dhoni on RCB
Sakal
Cricket
MS Dhoni: 'RCB ने बरीच वर्षे प्रतिक्षा केली होती...', धोनी बंगळुरूच्या पहिल्या IPL विजेतेपदाबाबत नेमकं काय म्हणाला?
MS Dhoni on Royal Challengers Bengaluru's IPL Victory: RCB ने १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर IPL २०२५ चे विजेतेपद जिंकले. एमएस धोनीने RCB च्या या विजेतेपदाबद्दल कौतुक केले असून त्याने त्यांच्या चाहत्यांबद्दलही भाष्य केले.
MS Dhoni Praise RCB Fans: इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या पहिल्या हंगामापासून खेळलेल्या संघांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा समावेश होता. बंगळुरू संघाने आत्तापर्यंत झालेले सर्व १८ हंगाम खेळले आहेत. मात्र त्यांना पहिल्या विजेतेपदासाठी तब्बल १८ वर्षांची प्रतिक्षा करावी लागली.
गेल्यावर्षी आयपीएल २०२५ स्पर्धेचे विजेतेपद RCB ने जिंकले. हे त्यांचे पहिलेच मोठे विजेतेपद ठरले. त्यामुळे त्यांच्या या विजेतेपदावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता बहुप्रतिक्षित एमएस धोनीचीही (MS Dhoni) प्रतिक्रिया आली आहे.

