महेंद्रसिंग धोनी IPL 2026 नंतर निवृत्ती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर तो केवळ IPL खेळत आहे.
गुडघ्याच्या दुखापतीमुळे व तंदुरुस्तीच्या अडचणीमुळे निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे मानले जाते.
MS Dhoni retirement confirmation IPL CSK legend: मागील चार-पाच वर्षांपासून सुरू असलेली महेंद्रसिंग धोनीच्या इंडियन प्रीमिअर लीगमधून निवृत्तीची वेळ अखेर ठरली. IPL 2026 नंतर चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार निवृत्त होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. दुखापत अन् तंदुरुस्तीच्या समस्येने माहीला मागील काही वर्षांपासून त्रास दिला आहे आणि तो प्रत्येकवेळी निवृत्तीच्या चर्चांना भिरकावून आयपीएल खेळतोय.