MS DHONI IPL RETIREMENT: HOW HE INFORMED CSK, OWNER REVEALS DETAILS
esakal
MS Dhoni becomes Chennai Super Kings mentor for IPL 2027: कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने इंडियन प्रीमिअर लीगमधून निवृत्ती होण्याचा निर्णय घेतला... २०२० मध्ये जेव्हा धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले होते, तेव्हापासूनच ही चर्चा सुरू झाली होती. पण, प्रत्येकवेळी धोनी या चर्चांवर टोलेबाजी करून नव्या दमाने आयपीएलचे नवीन पर्व खेळायला उतरायचा... पण, IPL 2026 मध्ये त्याला दुखापतीमुळे एकही सामना खेळता आला नव्हता आणि त्यामुळेच तो पुढील वर्षी खेळणार नाही, हे सर्वांना कळून चुकले होते. पण, चेन्नई सुपर किंग्सच्या मालकांकडून असे कोणतेही संकेत मिळाले नव्हते. धोनीचा निर्णय तोच घेईल, असे ते सांगायचे आणि अखेर तो दिवस उजाडला.