
MS Dhoni News: आजकाल सोशल मीडिया हा सर्वांच्याच आयुष्याचा एक भाग झाला आहे. म्हणजे सोशल मीडिया माहित नाही असा व्यक्ती आता क्वचितच सापडेल. सोशल मीडियावरून अनेकजण व्यक्त होत असतात आणि आता कोणत्याही गोष्टीवर मत व्यक्त करणंही सोपं झालं आहे.
जगातील मोठमोठे खेळाडूही सोशल मीडियावर आहेत आणि सोशल मीडियावर ते सक्रिय देखील आहेत. असं असताना अनेकांना आश्चर्य वाटते ते भारताचा माजी क्रिकेट कर्णधार एमएस धोनी मात्र सोशल मीडियावर फारसा सक्रिय नाही याचे. याबाबत धोनीनेच आता प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय त्याने चांगले क्रिकेट खेळले, तर पीआरची गरज नाही, असंही म्हटलंय.