

DHONI FUNNY VIDEO VIRA
esakal
DHONI FUNNY VIDEO VIRAL: जामनगरमधील नवरात्रोत्सवात धोनीने साक्षीला आईस्क्रीम भरवताना मजेशीर मस्ती केली. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या चर्चेत आहे. धोनी सोशल मीडियापासून दूर राहतो. मात्र, सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
मैदानावर धोनीचा शांत स्वभाव अनेकदा पाहायला मिळतो; पण या व्हिडिओत त्याचा मजेशीर अंदाज पाहायला मिळत आहे. पत्नी साक्षीसोबतचा हा व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच आवडत आहे.