
गेल्या काही वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीची आयपीएल निवृत्ती हा चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या काही हंगामापासून हा शेवटचा हंगाम आहे का, अशा चर्चा सुरू आहे. त्यातही सध्या सुरू असलेला आयपीएल २०२५ हंगाम त्याचा अखेरचा असण्याची दाट शक्यता व्यक्त होत होती.
त्यातच चेन्नईची यंदाच्या हंगामात कामगिरीही फारशी चांगली झालेली नाही चेन्नईने १२ पैकी फक्त ३ सामने आत्तापर्यंत जिंकले आहे. त्यामुळे त्यांचे आव्हानही या हंगामातील संपले आहे. त्यामुळे अखेरचे दोन साखळी सामने हे धोनीसाठी अखेरचे असतील, अशी चर्चा आहे. पण अशातच आता अशी अपडेट समोर आली आहे की धोनी पुढच्या वर्षीही खेळू शकतो.