CSK Ends IPL 2025 With Major Call: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ एका आठवड्याच्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू होतेय. शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात लढत होणार आहे. भारत-पाकिस्तान युद्धामुळे परदेशी खेळाडू मायदेशात परतले होते, परंतु आता त्यांना माघारी बोलावण्याचे आव्हान फ्रँचायझींना पेलावे लागतेय. बहुतेक परदेशी खेळाडू भारतात परतले आहेत, परंतु काहींनी वैयक्तिक कारण, तर काहींनी आंतरराष्ट्रीय दौऱ्याचं निमित्त सांगून माघार घेतली आहे. याचा फटका चेन्नई सुपर किंग्सलाही बसला आहे. चेन्नई सुपर किंग्सचे तीन स्टार खेळाडू आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी भारतात येण्याची शक्यता कमीच आहे आणि त्यात फ्रँचायझीने मोठा निर्णय घेतला आहे.