
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे आर्मीबद्दलचे प्रेम सर्वांनाच माहित आहे. त्याच्या विविध गोष्टींमधून ते दिसून आले आहे. आता पुन्हा एकदा याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
धोनीला २०११ मध्ये भारतीय लष्कराने लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी दिली आहे. त्याच्या बोलण्यातूनही अनेकदा त्याचे भारतीय लष्कराबद्दल असलेलं आकर्षण दिसून आले आहे. त्याने काही वर्षांपूर्वीच भारतीय लष्काराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये प्रशिक्षणही घेतले आहे. आता नुकतीच धोनीने रांचीमधील केंद्रीय औद्योगित सुरक्षा दलाला (CISF) भेट दिली आहे.