Ambani Family Sangeet: राधिका-अनंतच्या संगीत सोहळ्याला धोनी, हार्दिकसह अनेक क्रिकेटपटूंही हजेरी, पाहा Video

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: राधिका मर्चंट-अनंत अंबानी यांच्या संगीत सोहळ्याला अनेक क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती.
MS Dhoni - Sakshi  Radhika Marchant - Anant Ambani.jpg
MS Dhoni - Sakshi Radhika Marchant - Anant Ambani.jpgSakal

Anant Ambani-Radhika Merchant Wedding: भारतीय बिझनेसमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने लग्न राधिका मर्चंटसोबत १२ जुलै रोजी होणार आहे. त्याआधी वेगवेगळ्या विधींना सुरुवात झाली आहे. नुकतेच संगीत सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये अनेक क्रिकेटपटूंचाही समावेश आहे.

नुकतेच टी-20 वर्ल्डकपमध्ये चमकदार कामगिरी करून चाहत्यांची पुन्हा एकदा मनं जिंकणाऱ्या हार्दिक पांड्याने देखील उपस्थिती दर्शवली होती. हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल पांड्या आणि इशान किशन हेही हार्दिकसोबत पाहायला मिळाले. यासोबतच केएल राहुल आणि श्रेयश अय्यर देखील उपस्थित होते.

MS Dhoni - Sakshi  Radhika Marchant - Anant Ambani.jpg
Anant & Radhika Sangeet : अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला सलमानचा धमाकेदार परफॉर्मन्स ; स्टारकिड्सनीही केला डान्स

आपल्या अनोख्या स्टाईलमुळे चर्चेत राहणारा एमएस धोनी पत्नी साक्षीसह भारतीय पेहवात दिसून आला होता. रोहित शर्मापूर्वी कर्णधार धोनीच्या नेतृत्त्वामध्ये भारताने टी-20 वर्ल्डकप 2007 पटकावला होता.

टी-20 वर्ल्डकपच्या आधी कोलकाता नाईट रायडर्सला तिसऱ्यांदा जेतेपद मिळवून देणाऱ्या मुंबईच्या श्रेयश अय्यर यानेही या सोहळ्यामध्ये हजेरी लावली. तर, केएल राहुल सोबत त्याची पत्नी आथिया शेट्टी ही सुद्धा उपस्थित होती.

त्यांनी सोहळ्याआधी कपलपोझ देत फोटो काढले. टी-20 वर्ल्डकप 2024 च्या चॅम्पियन भारतीय संघामध्ये राहुल आणि श्रेयश अय्यर यादोघांनाही संघात समावेश केलं नव्हतं.

MS Dhoni - Sakshi  Radhika Marchant - Anant Ambani.jpg
Anant Ambani: संगीत सोहळ्यात सोन्याने मढले अनंत अंबानी; जॅकेटची किंमत पाहून धक्का बसेल?

भारतीय संघासाठी पुढचे आव्हान झिम्बाब्वे विरुद्धची टी२० मालिका असणार आहे. ज्यामध्ये शुभमन गिल भारतीय संघाचा कर्णधार आहे. 6 जुलैपासून या मालिकेची सुरूवात होणार असून 5 सामन्यासाठी टी-20 सामने होणार आहेत.

Crossword Mini:

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com