माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) भारतीयांच्या तंदुरुस्तीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्याच्या मते, आजकालच्या मुलांच्या दैनंदिन शारीरिक हालचाली कमी झाल्या आहेत. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघासाठी खेळणाऱ्या धोनीने स्वतःच्या मुलीचे उदाहरण दिले आणि ती देखील जास्त शारीरिक हालचालींमध्ये सहभागी नसते, असे सांगितले. ४४ वर्षीय धोनी त्याच्या कारकिर्दीच्या बहुतेक काळात कर्णधार आणि यष्टीरक्षक अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. तो क्रिकेटमधील सर्वात हुशार खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जातो.