MS Dhoni hookah comment viral video with Rishabh Pant
esakal
MS Dhoni hookah comment viral video with Rishabh Pant: भारतीय संघाचा यष्टिरक्षक रिषभ पंत आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, यांच्यातलं बॉडिंग सर्वांना माहित्येय... रिषभ कॅप्टन कूलला आपला आदर्श मानतो आणि राष्ट्रीय कर्तव्यावर नसताना तो अनेकदा माहीच्या कुटुंबियांसोबत दिसला आहे. सध्या रिषभ कोणत्याच क्रिकेट स्पर्धेत खेळत नाहीए आणि तो धोनी व मित्रांसोबत लंडनमध्ये असल्याचा दावा केला जातोय. सोशल मीडियावर एक Video Viral झाला आहे आणि त्यात रिषभ व मित्र पार्टी करताना दिसत आहेत. पण, त्यात धोनीच्या एका वाक्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला..