
Australia vs India Test Series: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर शनिवारपासून (१४ डिसेंबर) सुरू झाला आहे.
पण याचदरम्यान भारतीय संघ व्यवस्थापनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दौरा सुरू असला तरी संघासोबत असलेले यश दयाल, मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांना मायदेशी पाठवण्यात येणार आहे. हे तिघेही भारतीय संघासोबत राखीव खेळाडू म्हणून (Travelling Reserves) होते.