
Australia vs India 3rd Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनमधील गॅबा येथे खेळवला जात आहे. या सामन्यात पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ १३.२ षटकांचा खेळ झाला होता. पण दुसऱ्या दिवशी मात्र पहिल्या सत्राचा खेळ पूर्ण झाला आहे.
लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४३ षटकात ३ बाद १०४ धावा केल्या आहेत. दरम्यान, पहिल्या सत्रात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लॅबुशेन यांच्यात बेल्स आदलाबदलीचे नाट्य रंगले होते, ज्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.