Mumbai Cricket Association: मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक ठरल्याप्रमाणेच
Mumbai Cricket Association Election 2025: मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक १२ नोव्हेंबरला निश्चित. १५५ क्लबना मतदानाचा अधिकार मिळाला असून आठ उमेदवार रिंगणात आहेत. प्रसाद लाड, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर, अजिंक्य नाईक यांच्यात प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे.
मुंबई : अखेर मुंबई क्रिकेट संघटनेची बहुचर्चित निवडणूक बुधवारी (ता. १२) या नियोजित दिवशी होणार हे निश्चित झाले आहे. त्यासाठी उमेदवारी मागे घेण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे.