

Shreyas Iyer - Suryakumar Yadav
Sakal
MCA Leadership Shift 2026-27: मुंबई क्रिकेट असोसिएशनने यंदा २०२६-२७ हंगामासाठी मोठे नेतृत्व बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी २०२६-२७ स्पर्धेपूर्वी शार्दुल ठाकूरला मुंबईच्या प्रथम श्रेणी संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले.
त्याच्या जागेवर ३४ वर्षीय सिद्धेश लाडकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. यातच आता लिस्ट ए आणि टी२० म्हणजेच व्हाईट बॉल प्रकारात मुंबईच्या कर्णधारपदी कोण राहणार, हा प्रश्नही आहे.