

Shardul Thakur
Sakal
अजिंक्य रहाणेने मुंबई संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) शार्दुल ठाकूरकडे (Shardul Thakur) मुंबईच्या प्रथम श्रेणी संघाचे कर्णधारपद सोपवले होते.
तसेच श्रेयस अय्यरला लिस्ट ए आणि टी२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे शार्दुलने गेल्या हंगामात मुंबईचे रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) नेतृत्व केले होते. मात्र आता त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आहे.