

Ranji Trophy
sakal
मुंबई : मुंबईच्या क्रिकेट संघाने बुधवारी पुद्दुचेरी संघावर एक डाव व २२२ धावांनी दणदणीत विजय संपादन करीत रणजी क्रिकेट करंडकातील ड गटामध्ये सात गुणांची कमाई केली. मुंबईचा संघ आता पाच सामन्यांमधून तीन विजयांसह २४ गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. पुद्दुचेरी संघाला पाच सामन्यांमधून पाचच गुणांची कमाई करता आलेली आहे. १७० धावांची खेळी साकारणारा सिद्धेश लाड सामनावीर ठरला.