
Ayush Mhatre World Record in List A Cricket: मुंबईचा १७ वर्षीय क्रिकेटपटू आयुष म्हात्रेने मंगळवारी (३१ डिसेंबर) २०२४ वर्षाचा शेवट दणक्यात केला आहे. त्याने एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. आयुष मंगळवारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये नागालँडविरुद्ध सामना खेळला. त्याने या सामन्यात ताबडतोड दीडशतक ठोकले.