Hardik Pandya deleted Instagram account
Why Hardik Pandya deleted Instagram account? मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअऱ लीग २०२६ मध्ये अपयशाचा सामना करावा लागला. त्यांनी १४ सामन्यांत फक्त ४ विजय मिळवले आणि ते तालिकेत नवव्या क्रमांकावर राहिले. MI च्या लाजीरवाण्या कामगिरीनंतर कर्णधार हार्दिक पांड्या याच्याकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घेतली जाईल, अशी चर्चा रंगली आहे. अशात हार्दिकचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट करण्यात आले आहे. हार्दिक सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. पण बुधवारी संध्याकाळी पांड्याच्या अकाऊंटवर "Sorry, this page isn't available. The link you followed may be broken, or the page may have been removed" असा मॅसेज दिसू लागला.