Mumbai Indians New Captain? पोलार्डने जुन्या भिडूंना एकत्र आणले! आता रोहित शर्माला कॅप्टन बनवण्याची तयारी, पण एक अडचण...

Mumbai Indians new captain for IPL 2027: आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोटात मोठ्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. मुख्य प्रशिक्षक किरॉन पोलार्ड याने संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मुंबई इंडियन्सशी घट्ट नातं असलेल्या जुन्या भिडूंना पुन्हा एकत्र आणलं आहे.
Mumbai Indians new captain for IPL 2027

Mumbai Indians new captain for IPL 2027

esakal

Updated on: 

Kieron Pollard new coaching staff Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात अपेक्षेपेक्षा वेगाने हालचाली होताना दिसत आहेत. किरॉन पोलार्डची मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर MI ने त्यांचा संपूर्ण सपोर्ट स्टाफ बदलला. मुख्य प्रशिक्षक किरॉन पोलार्ड याने संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मुंबई इंडियन्सशी घट्ट नातं असलेल्या जुन्या भिडूंना पुन्हा एकत्र आणलं आहे. रॉबिन उथप्पाची फलंदाजी प्रशिक्षकपदी, मिचेल मॅक्लेनेघनची गोलंदाजी प्रशिक्षकपदी, टी. दिलीप यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी, तर धवल कुलकर्णीची विकासात्मक गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता कर्णधारपदावर रोहित शर्मा दिसेल, अशी चर्चा जोर धरतेय.

Loading content, please wait...