MUMBAI INDIANS FANS ANGRY OVER IPL 2026 TICKET PRICE HIKE AT WANKHEDE
esakal
Wankhede Stadium ticket rates IPL 2026 comparison : मुंबई इंडियन्सच्या आयपीएल २०२६ मधील घरच्या मैदानावरील तिकिटांच्या विक्रीचा पहिला टप्पा आजपासून सुरू झाला, परंतु चाहत्यांना तिकिटांच्या किमती पाहून फार आनंद झालेला नाही. पाचवेळच्या आयपीएल विजेत्या MI ने वानखेडे स्टेडियमवरील काही तिकिटांच्या विक्रीचा पहिला टप्पा आजपासून सुरू केला. मात्र, MI च्या निष्ठावान चाहत्यांमध्ये नेहमी दिसणाऱ्या उत्साहाऐवजी, तिकिटांची विक्री सुरू झाल्यावर, विशेषतः त्यांच्या किमतींमुळे, प्रचंड संताप दिसून आला.