
मुंबई इंडियन्स ही फ्रँचायझी आता फक्त आयपीएलपर्यंत मर्यादीत राहिलेली नाही. या फ्रँचायझीचे अनेक संघ जगभरातील विविध टी२० लीग स्पर्धामध्ये खेळताना दिसतात.
नुकतेच मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या एमआय न्यूयॉर्क संघाने मेजर लीग क्रिकेट २०२५ स्पर्धेचे विजेतेपद रविवारी (१३ जुलै) जिंकले आहे. हे मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने एकूण सर्व स्पर्धांमधील मिळून १३ वे विजेतेपद आहे.
रविवारी एमआय न्यूयॉर्कने शेवटच्या षटकापर्यंत रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात ग्लेन मॅक्सवेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या वॉशिंग्टन फ्रीडम संघाला ५ धावांनी पराभवाचा धक्का दिला. २२ वर्षीय रुशील उगारकर एमआय न्यूयॉर्कच्या विजयाचा हिरो ठरला. शेवटच्या षटकात त्याने केलेली गोलंदाजी अत्यंत महत्त्वाची ठरली.