
नव्वदच्या दशकातील लहान मुलांचा सर्वात आवडता कार्यक्रम म्हणजे शक्तीमान. भारतात शक्तीमानच्या रुपात पहिल्यांदाच सुपरहिरोची ओळख सर्वांना झाली होती. त्यामुळे भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात शक्तीमानने महत्त्वाचं स्थानही मिळवलं.
त्यातील मुकेश खन्ना यांनी केलेली गंगाधर आणि शक्तीमान ही भूमिका प्रचंड गाजली. आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वांना पुन्हा त्याची आठवण करून दिली आहे.