

MI NEXT CAPTAIN
esakal
WHO WILL BE MUMBAI INDIANS NEXT CAPTAIN: मुंबई इंडियन्सने नुकतीच कीरॉन पोलार्ड यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यानंतर आता संघाचा पुढचा कर्णधार कोण असेल, याची चर्चा सुरू झाली आहे.
हार्दिक पांड्या अजूनही संघाचा भाग आहे. मात्र, आयपीएल २०२७ पूर्वी त्याला दुसऱ्या संघात ट्रेड केलं जाऊ शकतं, अशी चर्चा आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने रोहितच्या नावाला पाठिंबा दिला आहे.