

Mumbai Indians Suffer Double Blow Ahead of IPL 2026 Opener vs KKR
esakal
Mumbai Indians injury news before IPL 2026 first match: मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या लढतीत रविवारी वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्सचा सामना करणार आहे. पण, या सामन्यापूर्वी MI ला मोठा धक्का बसला आहे. मिचेल सँटनर ( Mitchell Santner ) आणि विल जॅक्स ( Will Jacks) हे दोन खेळाडू पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजेच संघाला पहिल्या सामन्यात या दोन प्रमुख परदेशी खेळाडूंसह मैदानावर उतरावे लागणआर आहे. स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहसह या दोघांनीही मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात सहभाग घेतला नाही.