
WPL 2025 PLAYOFFS SCENARIO MUMBAI INDIANS : हरमनप्रीत कौरच्या मुंबई इंडियन्स संघाने गुरुवारी महिला प्रीमिअर लीग २०२५ मध्ये यूपी वॉरियर्सवर विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. WPL चा इलिमिनेटर सामना १३ मार्चला मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे आणि दोन दिवसांनी इथेच फायनल होईल. पण, ७ दिवस शिल्लक राहिलेले असताना अद्याप फायनलमध्ये थेट प्रवेश कोणाला मिळणार याचे चित्र स्पष्ट झालेले नाही.