
Mumbai Indians vs Delhi Capitals WPL Final: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये उद्या (ता. १५) महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सला याप्रसंगी दुसऱ्या जेतेपदाची आशा असणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. पहिल्या दोन मोसमांत दिल्ली कॅपिटल्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यंदा त्यांना अजिंक्यपदावर मोहर उमटवण्याची आशा असेल.