
शनिवारी (१५ मार्च) मुंबई इंडियन्स महिला संघाने वूमन्स प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्स संघाला ८ धावांनी पराभवाचा धक्का दिला आणि दुसऱ्यांना विजेतेपदावर नाव कोरले.
विशेष म्हणजे २०२३ मध्ये जेव्हा मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा विजेतेपदाला गवसणी घातली होती, त्यावेळीही त्यांनी अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघालाच पराभवाचा धक्का दिला होता आणि तो अंतिम सामनाही ब्रेबॉर्न स्टेडियमवर झाला होता.