
Syed Mushtaq Ali Trophy 2024 Mumbai vs Baroda Semi Final
मुंबईच्या संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बडोदा संघावर दणदणीत विजय मिळवला. अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane) आक्रमक अर्धशतक झळकावले आणि त्याला कर्णधार श्रेयस अय्यरची साथ मिळाली. गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीनंतर फलंदाजांनी दिलेल्या योगदानाच्या जोरावर मुंबई फायनलमध्ये पोहोचली. अजिंक्य इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणार आहे आणि कदाचित त्याच्याकडे कर्णधारपद जाऊ शकते. अजिंक्यने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत दाखवलेला फॉर्म हा तो IPL 2025 साठी सज्ज असल्याचे दर्शवतेय.