

Ranji Trophy 2024 Mumbai Team - रणजी करंडक स्पर्धेतील मुंबईचा पुढील सामना २६ ऑक्टोबरपासून सुरू होतोय. गतविजेत्यांनी त्रिपुराविरुद्धच्या लढतीसाठी कालच संघाची घोषणा केली. सूर्यकुमार यादवने वैयक्तिक कारणामुळे या सामन्यातून माघार घेतली, तर फॉर्माशी संघर्ष करणाऱ्या पृथ्वी शॉ याला संघातून डच्चू दिला गेला. त्यात आता महाराष्ट्राविरुद्धच्या लढतीतील शतकवीर श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer Injury) याचा खांदा पुन्हा दुखावला गेल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे तो मुंबईच्या पुढील लढतीला मुकणार आहे. त्याला किमान एका आठवड्याच्या विश्रांतीची गरज आहे.