सर्फराज खानने बुची बाबू ट्रॉफीत सलग दुसरे शतक झळकावले.
हरयानाविरुद्ध त्याने १०५ चेंडूत ९ चौकार व ५ षटकारांसह १०७ नाबाद धावा केल्या.
मुंबईची अवस्था ४ बाद ८४ अशी बिकट असताना सर्फराजने डाव सावरला.
Sarfaraz Khan scored a brilliant century : देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करूनही निवड समितीने दुर्लक्षित केलेल्या सर्फराज खानने बुची बाबू ट्रॉफी स्पर्धेत सलग दुसरे शतक झळकावले. मुंबईचा संघ अडचणीत असताना हरयानाविरुद्ध त्याने षटकाराने शतक पूर्ण केले. त्याच्या शतकाने मुंबईची बाजू भक्कम केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संधी मिळतेय का, याची सर्वाना उत्सुकता आहे.