

T20 Mumbai league fight video
esakal
T20 Mumbai league fight video: मुंबई टी-२० लीगच्या (T20 Mumbai league) धमाकेदार हंगामाचा शेवट शनिवारी झालेल्या अंतिम सामन्याने झाला. या सामन्यात एआरसीएस अंधेरी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या एमएस मराठा रॉयल्सने चिन्मय राजेश सुतारच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर ५ विकेट्स गमावत १५४ धावांचा आव्हानात्मक स्कोअर उभा केला. १५५ धावांचा पाठलाग करताना एआरसीएस अंधेरी संघाला २० षटकांत ८ विकेट्स गमावून केवळ १४६ धावाच करता आल्या. मात्र, शेवटच्या काही षटकांमध्ये या सामन्यात मोठा राडा पाहायला मिळाला.