
MUM Vs J&K Ranji Trophy 2024-25 Match: शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या कारकीर्दितील दुसरे शतक झळकावताना मुंबई संघाची लाज वाचवली. ७ बाद १०१ अशा अडचणीत सापडलेल्या मुंबईच्या संघाला शार्दूल व तनुष कोटियन या जोडीने सावरले. या दोघांच्या १८४ धावांच्या भागीदारीने जम्मू काश्मीरची डोकेदुखी वाढवली. पण, तिसऱ्या दिवसाच्या सहाव्या षटकात शार्दूल बाद झाला आणि पाठोपाठ पुढील २० मिनिटांत उर्वरित संघ माघारी परतला. मुंबईचा दुसरा डाव २९० धावांवर गुंडाळण्यात रणजी करंडक स्पर्धेत जम्मू काश्मीरला यश आले आणि त्यांच्यासमोर २०५ धावांचे लक्ष्य आहे.