Viral Video: तू स्वतःचा चेहरा आधी आरशात पाहा...; IND vs SL कसोटीत स्टुडिओत भारताचे दोन दिग्गज भांडले; अजिंक्य रहाणे बसला होता शेजारी

Murali Kartik vs Sanjay Manjrekar: भारत-श्रीलंका पहिल्या कसोटीदरम्यान मुरली कार्तिक आणि संजय मांजरेकर यांच्यात समालोचन बॉक्समध्ये रंगली मजेशीर तू-तू मैं-मैं. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
Murali Kartik vs Sanjay Manjrekar

Murali Kartik vs Sanjay Manjrekar

esakal

Updated on

MURALI KARTIK VS SANJAY MANJREKAR: सध्या भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून, तिथे दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक मोठा वाद पाहायला मिळाला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, क्रिकेट वर्तुळातही या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ तिसऱ्या दिवशी ४४२ धावांवर सर्वबाद झाला.

त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना केवळ २८४ धावांवर गुंडाळलं. या सामन्यात मानव सुथार आणि रवींद्र जडेजा आपल्या फिरकीने श्रीलंकेच्या फलंदाजांना चांगलंच अडचणीत आणत होते. मात्र, या सगळ्यांपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे मैदानाबाहेर वेगळीच घटना घडत होती. मैदानाबाहेर दोन दिग्गजांमध्ये वाद पाहायला मिळाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com